तुमचे टोमॅटो पीक सध्या फुल आणि सेटिंगनंतरच्या अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यात आहे. याच काळात झाडावर एकाच वेळी फूलकळी निघणे आणि फळधारणा (Setting) होणे सुरू असते.अशा वेळी बऱ्याच शेतांमध्ये अचानक फूलगळ होणे, फळे तडकणे, फळे खालून काळी पडून सडणे किंवा झाडावर फळांचा लोड वाढताच पाने पिवळी पडणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. या सर्व समस्यांवर वेळीच मात करून पिकाची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जमिनीतून ओनील (0:40:39 + Fe + Mg) आणि फवारणीतून सीए+बी + प्लॅनोफिक्स देणे अत्यंत फायदेशीर ठरते.समस्येवर पहिला वार : ओ’नील (0:40:39 + Fe + Mg)हा डोस पिकाच्या तीन वेगवेगळ्या गरजा एकाच वेळी पूर्ण करतो आणि झाडाचा पिवळेपणा दूर ठेवतो:· पहिली समस्या (कमकुवत कळी): यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने नवीन, भरपूर आणि मजबूत फुलकळी निघण्यास मदत होते.· दुसरी समस्या (फूलगळ): पोटॅश आणि फॉस्फरस एकत्र काम करून फुलांचे रूपांतर फळात (Setting) व्यवस्थित करतात, ज्यामुळे फूलगळ पूर्णपणे थांबते.· तिसरी समस्या (कमी वजन व फुगवण): सेट झालेल्या लहान टोमॅटोची फुगवण करणे, त्यांना उत्तम चमक देणे आणि वजन वाढवणे यासाठी यातील पोटॅश अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.फेरस (Fe) आणि मॅग्नेशियम (Mg) मुळे पिवळेपणा गायब!टोमॅटोवर जेव्हा फळांचा भार (Fruit Load) वाढतो, तेव्हा झाडाची पूर्ण ऊर्जा फळांकडे जाते. यामुळे पानावरील अन्नद्रव्ये कमी होऊन पाने पिवळी पडू लागतात.· मॅग्नेशियम: पानांच्या मध्यभागी असणारे हरितद्रव्य (Chlorophyll) टिकवून ठेवते, ज्यामुळे जुनी पाने पिवळी पडत नाहीत.· फेरस: झाडाच्या शेंड्याची नवीन पाने पिवळी पडू देत नाही.फायदा: यामुळे झाड शेवटपर्यंत हिरवेगार आणि टवटवीत राहते, परिणामी फळांचे पोषण उत्तम होते.समस्येवर दुसरा वार : सीए+बी (कॅल्शियम + बोरॉन) सोबत ‘प्लॅनोफिक्स’झाडावर जेव्हा एकाच वेळी हजारो फुले असतात, तेव्हा झाडाला हॉर्मोनल बॅलन्स (संप्रेरकांचे संतुलन) आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा या दोन्ही गोष्टींची गरज असते. जेव्हा हे तीन घटक एकत्र येतात, तेव्हा कळीपासून फळ बनण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येत नाही.· फूलगळ आणि फळगळ १००% थांबते: प्लॅनोफिक्स झाडामध्ये ‘एबसिसिक ॲसिड’ (ज्यामुळे फुले गळतात) तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे फूलगळ आणि नव्याने सेट झालेली लहान फळे गळणे पूर्णपणे थांबते.· सेटिंग दुप्पट वेगाने होते: बोरॉन आणि प्लॅनोफिक्स एकत्र मिळाल्यास फुलांचे फळांत रूपांतर होण्याची प्रक्रिया दुप्पट वेगाने होते. एकाच घडातील (Cluster) जास्तीत जास्त फुले सेट होतात.· फळे तडकण्यापासून (Fruit Cracking) बचाव: फळाची साईज वाढताना टोमॅटोला चिरा पडतात. बोरॉन पेशींच्या भिंती लवचिक बनवतो, ज्यामुळे फळ न तडकता उत्तम साईज पकडते.· खालून फळ सडणे बंद (BER वर नियंत्रण): टोमॅटोच्या खालच्या बाजूला काळा डाग पडून फळ सडते. हा कोणताही रोग नसून कॅल्शियमची कमतरता आहे. कॅल्शियमचा पुरवठा फळे टणक, चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.३. वापरण्याचे प्रमाण आणि पद्धत (Dose)ड्रिपद्वारे :· ओनील (0:40:39+Fe + Mg) : 4 किलो प्रति एकर.फवारणीद्वारे : सीए+बी: 2 मिली प्रति लीटर पाणी.

