द्राक्ष घड जिरणे थांबवा: कारणे, अचूक उपाय आणि योग्य नियोजन

द्राक्ष बागेत घड जिरणे किंवा वाढीच्या वेळी घड जिरून जाणे ही एक मोठी समस्या आहे. हे टाळण्यासाठी घड जिरण्यामागचे शास्त्रीय कारण आणि योग्य नियोजन खालीलप्रमाणे आहे:घड जिरण्यामागचे मूळ शास्त्र:१. ऊर्जेची कमतरता आणि फॉस्फरस (स्फुरद):·        ऊर्जेचा स्त्रोत: फॉस्फरस हा वेलीसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत (ATP) आहे. नवीन फुटी, घडनिर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी याची गरज असते.·        घड मजबूत करणे: यामुळे पेशी विभाजन वेगाने होते, ज्यामुळे घड सशक्त, लांब आणि टिकून राहतात.·        नत्राचा समतोल: नत्राचा अतिवापर झाल्यास काड्या जोमाने वाढतात आणि घड जिरतात. फॉस्फरस व पालाश मिळून नत्राचा प्रभाव नियंत्रित ठेवतात.२. पांढऱ्या मुळांचे (White Roots) महत्त्व:·        अन्न व पाणी शोषण: जमिनीतून अन्नद्रव्ये आणि पाणी शोषण्याचे काम फक्त पांढऱ्या मुळ्या करतात.·        घड टिकण्यासाठी: मुळ्या निरोगी व भरपूर नसतील, तर झाडाला ताण बसून घड पोसत नाहीत आणि जिरतात.३. फॉस्फरस व पांढऱ्या मुळांचा संबंध:·        रूट प्रमोटर: जमिनीत फॉस्फरस उपलब्ध असेल तर नवीन पांढऱ्या मुळ्यांचा विकास झपाट्याने होतो. जितक्या मुळ्या जास्त, तितका अन्नपुरवठा उत्तम!

घड जिरू नये म्हणून करावयाचे उपाय (ड्रीप व फवारणी नियोजन):१. ड्रीपद्वारे नियोजन (हेनीग सोल्युशन – 11:44:11):·        यात स्फुरद (४४%) उच्च प्रमाणात असते.·        मुळांच्या सानिध्यात जाऊन पांढऱ्या मुळ्यांची संख्या वेगाने वाढवते.·        फिक्सेशन न होता फॉस्फरस मुळांद्वारे त्वरित शोषला जातो व वेलीला सतत ऊर्जा मिळते.२. फवारणीचे नियोजन (डीपी-98 आणि 6:37:17):आणि 

·        NPK 6:37:17: स्फुरद (३७%), पालाश व नत्राच्या संतुलनामुळे घड आणि फुटींना तात्काळ अन्न मिळते.·        डीपी-98: हे प्रगत फोस्फोरसयुक्त उत्पादन झायलेम व फ्लोयेम द्वारे वहन करते. यामुळे वेलीची अंतर्गत प्रतिकारशक्ती प्रचंड वाढते, मुळे-काड्या बळकट होतात आणि केवड्यासारख्या बुरशीजन्य रोगांपासून बागेचे रक्षण होते.३. फवारणी: मायक्रोमॅक्स (Mg + सूक्ष्म अन्नद्रव्ये):·        मॅग्नेशियम (Mg): हरितद्रव्य वाढवून प्रकाशसंश्लेषण क्रिया वेगवान करते, ज्यामुळे घड पोसण्यास मदत मिळते.
मात्रा:फवारणीद्वारे 200 लीटर पाण्यासाठी·        डीपी-98: 250 मिली·        मायक्रोमॅक्स: 200 मिली

ड्रिपद्वारे:·        हेनीग सोल्युशन: 3 किलो प्रती एकरमहत्त्वाची टीप: वरील अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबतच छाटणी, कॅनोपी व्यवस्थापन, सूर्यप्रकाशाचे नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रण यांचे योग्य नियोजन असणे अत्यंत गरजेचे आहे!

 

 

 

 

 

graps ghad jiru naye fb post

dp 98

micromax

henning

Hi
Share

Leave a Comment